कंपनीतील वरिष्ठ अधिकारी द्यायचा त्रास! त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने केली आत्महत्या, वाकडमधील घटना…


पुणे : वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून कंपनीत काम करत असलेल्या कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हि घटना रहाटणी येथील नखातेनगर येथे घडली आहे.

प्रदीप अशोक देवताळे (वय ३८ रा. नखातेनगर कमानीजवळ, रहाटणी) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी  पोलीस उपनिरीक्षक अवधुत महादेव शिंगारे यांनी वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी (ता.१५) फिर्याद दिली आहे. यावरुन कंपनीचे अधिकारी अल्लुरी, अमन, किरण कापुरे, अनिकेत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  मयत प्रदीप देवताळे हे फ्रेश टू होम कंपनीत मागील दीड वर्षापासून नोकरी करत आहे. कंपनीत काम करत असताना त्यांचे सिनियर्स अल्लुरी, अमन यांनी प्रदीप यांना टार्गेट करुन त्यांचा मानसिक छळ करत होते. वरिष्ठांकडून होत असलेल्या सततच्या छळाला कंटाळून प्रदीप देवताळे यांनी नखातेनगर येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी स्वत: फिर्याद देऊन चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अवधुत शिंगारे करीत आहेत.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!