Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला, जाणून घ्या..

Maharashtra Politics : राजकीय वर्तुळात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीमध्ये जागा वाटपासंदर्भात जोर- बैठका सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

अशातच महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आली असून भाजप लोकसभेच्या जागा लढवणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून समोर आली आहे. तसेच शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला १६ जागा मिळणार आहेत. यामध्ये शिंदे गट १० जागा तर अजित पवार गट सहा जागा लढवणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने केंद्रातील भारतीय जनता पक्ष आणि राज्यातील भाजप, शिंदे , अजित पवार गटाची महायुती कामाला लागली आहे. Maharashtra Politics

अशातच महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला असून भाजप राज्यामध्ये ३२ लोकसभेच्या जागा लढवणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे.
तसेच शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला १६ जागा मिळणार आहेत. ज्यामध्ये शिंदे गट १० जागा तर अजित पवार गट सहा जागा लढवणार आहे. आज मंगळवार (ता.१६) भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह दिल्लीमध्ये महत्वाची महत्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीत भाजपच्या या ३२ लोकसभेच्या जागांचा आढावा घेतला जाणार आहे.
दरम्यान, भाजपकडून लोकसभेसाठी दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निवडणुकीत महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.