Crime News : मुदखेड येथे अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून खून, भयंकर घटनेने उडाली खळबळ..

Crime News : महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
रोहीपीपळगाव येथुन दुचाकीवरू आलेल्या दोंघानी रविवारी रस्त्यावर खेळत आसलेल्या बालीकेस पळवुन नेले होते. सोमवारी सकाळी मुदखेड येथील उमरी रस्त्यावर सदर ८ वर्षीय बालिकेचा मृतदेह सापडला.
बलात्कार करून खून केला असावा असा प्राथमीक आदाज पोलीसांनी वर्तविला असुन उत्तरीय तपासणीनंतर सत्य उजेडात येईल, अशी माहिती दिली आहे. मात्र या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. Crime News
मिळालेल्या माहिती नुसार, रोही पिंपळगाव तालुका मुखेड येथील ८ वर्षीय मुलीगी रविवारी गावात रस्तयावर खेळत होती दुचाकीवरून आलेल्या दोघाजणांनी तिला फूस लावून पळून नेले .
मुदखेड पोलीस ठाण्यात मुलीला पळवुन नेले असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दीली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी सदर मुलीवा मृतदेह मुदखेड येथील उमरी रस्तयावर सापडला. या बालीकेचा बलात्कार करून खून केला व रस्त्यालगत एका खड्ड्यात फेकून दिल्याची मयत मुलीच्या नातेवाईकांची तक्रार आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या सह पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. सदर घटनेबाबत मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती .
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या मुलीचा बलात्कार करून खुन केला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवले आहे. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला आहे तपासणीनंतर सत्य उजेडात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी दिली आहे.