शिरुर तालुक्यात जुण्या वादातून एकाचा खून! चव्हाणवाडीत दोघा भावांवर खूनाचा गुन्हा दाखल..!!


शिरुर : शिरूर तालुक्यात जुन्या वादातून दोन जणांनी एका व्यक्तीस बेदम मारहाण केल्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्य झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी सचिन गरुड यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर बाळासाहेब माणिकराव गरुड (वय ५३) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी संतोष रभाजी मोहिते आणि राहुल रभाजी मोहिते  (रा.चव्हाणवाडी, ता. शिरूर, जि.पुणे) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष रभाजी मोहिते आणि राहुल रभाजी मोहिते यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून बाळासाहेब माणिकराव गरुड यांना शिवीगाळ व दमदाटी करुन लोखंडी खोऱ्याने तसेच दगडाने डोक्यात व पायावर बेदम मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत शिरूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखला केले. त्यानंतर त्यांना अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान बाळासाहेब गरुड यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार हे पुढील तपास करत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!