Pune Crime : लग्न करीन तर तुझ्यासोबतच करीन, तगादा लावणाऱ्या प्रेयसीला संपवलं, पुण्यात घडली धक्कादायक घटना..

Pune Crime पुणे : दिवसागणिक गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वेगात वाढले आहेत. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.
महिलेने लग्नाचा तगादा लावल्याने प्रियकराने तिचा खदानीत ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना खराबवाडी येथील स्टोन क्रशरच्या खदानीत घडली आहे. पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. Pune Crime
देवेंद्रकुमार श्यामलाल लोधी (वय. २७, रा. खराबवाडी, ता. खेड. मूळ रा. मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विलास गोसावी यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
मिळालेल्या माहिती नुसार, मृत महिला आणि आरोपी देवेंद्रकुमार यांचे २०१०पासून प्रेमसंबंध होते. महिलेचे २०१८मध्ये लग्न झाले. मात्र, पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी ती माहेरी येऊन राहू लागली. त्यानंतर तिचे देवेंद्रकुमार याच्यासोबत पुन्हा बोलणे होऊ लागले.
दरम्यान, देवेंद्रकुमारची त्याच्या भावाच्या मेहुणीसोबत लग्नाची बोलणी सुरू झाली. ही बाब महिलेला समजली असता तिने ‘लग्न करीन, तर तुझ्यासोबतच करीन, तुझ्यासोबतच राहीन,’ असा तगादा देवेंद्रकुमारकडे तगादा लावला. Pune Crime
त्यामुळे आरोपीने तिचा खून करण्याचे ठरवून देवेंद्रकुमारने तिला बोलावून घेतले. दुचाकीवरून तिला खराबवाडी येथील डोंगरावर नेले. जवळच असलेल्या स्टोन क्रशरमधील खदानीत तिला उंचावरून ढकलले. या घटनेचा पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलिस करीत आहेत.