Munawwar Rana : प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..

Munawwar Rana : प्रसिद्ध उर्दू कवी मुन्नावर राणा याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजाराशी झुंझत होते. अखेर लखनऊच्या पीजीआय हॉस्पिटलमधे त्यांची प्राणज्योत मावळली.
मुनव्वर राणा यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावली होती. लखनौ येथील पीजीआय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुनव्वर यांना किडनीचाही आजार होता. किडनीचा त्रास होत असल्याने त्यांना याआधीदेखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अलीकडेच त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने त्यांना डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यांना न्यूमोनियाचा त्रास होत असल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. Munawwar Rana
मुन्नावर राणा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर होते. मुनव्वर राणा यांची गणना देशातील नामवंत कवींमध्ये केली जाते. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. याशिवाय त्यांना माती रतन सन्मानानेही सन्मानित करण्यात आले आहे.
मुनव्वर राणा प्रसिद्ध शायर आणि कवी होते. उर्दू व्यतिरिक्त हिंदी आणि अवधी भाषेत ते कविता लिहायचे. मुनव्वर राणा यांनी वेगवेगळ्या शैलीत गझलांचं प्रकाशन केलं आहे. २०१४ साली त्यांना उर्दू साहित्यासाठी २०१४ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
तसेच २०१२ साली त्यांना ‘माटी रतन सम्मान’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मुनव्वर यांनी एका वर्षानंतर पुरस्कार सरकारला परत केला होता. तसेच त्यांनी वाढत्या असहिष्णुतेमुळे कधीही सरकारी पुरस्कार स्वीकारण्याची शपथ घेतली होती.