Nashik News : मोठी बातमी! भुजबळ कुटुंब मोठ्या अडचणीत? बँकेची नोटीस आल्याने उडाली खळबळ…


Nashik News : राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांचे कुटूंब पुन्हा एकदा अडचणीत आले आहे. माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांना बँकेने नोटीस पाठवली आहे.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कर्ज थकवल्याप्रकरणी बँकेने ही नोटीस बजावल्याची माहिती मिळत आहे. नाशिक जिल्हा बँकेने माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांना नोटीस पाठवली आहे.

यावर अजून भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली नाही. याबाबत माहिती अशी की, 51 कोटी 66 लाख थकीत कर्ज वसुलीसाठी बँकेकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनी दाभाडी या ठिकाणी जाऊन स्ट्रोकच्या गेटवर नोटीस चिकटवली आहे. Nashik News

थकीत कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेने कडक पावले उचलली आहेत. अधिकाऱ्यांनी कारखाना कार्यस्थळावर जाऊन ही नोटीस चिकटवली आहे. यामुळे भुजबळ यांना हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

कारखान्याचे संचालक असलेले पंकज भुजबळ समीर भुजबळ यांच्यासह सत्येन आप्पा केसरकर यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे. आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!