Pune : पुरंदर विमानतळाला मान्यता!! केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची माहिती..


Pune पुणे : पुरंदर विमानतळाला केंद्राने मान्यता दिली आहे. आता आम्ही राज्य सरकारकडून मिळणार्‍या जागेच्या प्रतीक्षेत आहोत. जागा मिळाल्यावर लगेच कार्यवाही करू, अशी माहिती केंद्रीय हवाई राज्यमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे.

पुण्यातील नवीन टर्मिनलच्या पाहणीसाठी ज्योतिरादित्य शिंदे पुण्यात आले होते. पाहणी झाल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी शिंदे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे करण्यासंदर्भातील प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सरकार बदलले की हा प्रश्न प्रलंबितच राहत आहे. मात्र, राज्यातील महायुती सरकारच्या काळात हा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

मागे एकदा पुणे विमानतळावरील एरोमॉल पार्किंगच्या उद्घाटनावेळी पत्रकारांनी राज्यमंत्री शिंदे यांना पुरंदर विमानतळाबाबत प्रश्न विचारले होते. त्या वेळी त्यांनी याबाबत न बोलता काढता पाय घेतला होता. Pune

दरम्यान,शुक्रवारी (ता.१२) पुन्हा पुण्यात पत्रकारांनी हाच प्रश्न शिंदे यांना विचारला. त्या वेळी त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देत पुरंदर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे संकेत दिले.

मागील महिन्यात जे. डब्ल्यू. मेरिएटमध्ये झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदर विमानतळ झाल्यास पुणे शहर हे देशातील ग्रोथ इंजिन बनेल, असे उद्गार काढले होते.

त्यानंतर आता केंद्रीय हवाईमंत्र्यांनीच शुक्रवारी लोहगावमधील विमानतळ टर्मिनलमध्ये केंद्राने या विमानतळाला मान्यता दिल्याचे सांगत आता फक्त राज्य सरकारने जागा देण्याची प्रतीक्षा असल्याचे सांगितले आहे.

लोहगावमधील नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. त्याच्या पाहणीसाठी शिंदे आले होते. त्यांनी नवीन टर्मिनल इमारतीच्या आतमधील आणि बाहेरील सर्व ठिकाणाची बारकाईने पहाणी केली.

त्यावेळी त्यांना गंजलेले चेंबर, त्याचे निघालेले खिळे, ठिकठिकाणी बसलेली धूळ, प्रवेशद्वारावरची निघालेली अक्षरे पाहायला मिळाली. त्या वेळी त्यांचा संताप अनावर झाला. आणि त्यांनी विमानतळ अधिकार्‍यांना चांगलाच दम भरत, तातडीने स्वच्छतेचे आदेश दिले आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!