PM Modi Inaugurate Atal Setu : पंतप्रधान मोदींच्या हस्ते अटल सेतूचे उद्घाटन, ७० हजार लोकं करणार दैनंदिन प्रवास…


PM Modi Inaugurate Atal Setu : आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा आज नाशिकमधून दौरा सुरू झाला.मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे आता हा रोड खुला होणार आहे.

मोदींनी नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर रोड शो केला. तसेच काळाराम मंदिरात जाऊन काळारामाचे दर्शनही घेतले. त्यांनी नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते.

दरम्यान, दररोज सुमारे ७० हजार लोक या पुलावरून प्रवास करतील. येथे ४०० कॅमेरे बसवण्यात आले आहेत, याशिवाय ट्रॅफिक प्रेशरची माहिती गोळा करण्यासाठी एआय आधारित सेन्सर बसवले आहेत. PM Modi Inaugurate Atal Setu

मोदींनी ३०,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण केले आहे. दरम्यान, दिघा स्थानकावर ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे. इतकेच नाही तर राजन विचारे यांच्यासमोरच भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

यातील बरेचशी विकासकामे ही महाविकास आघाडीच्या काळात झाली होती मात्र निमंत्रणाच्या पत्रिकेवर कुठेही ठाकरे गटाच्या नेत्यांची नावे नाहीत. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!