Sharad Mohol : गुंड शरद मोहोळ हत्येप्रकरणी पोलिसांना मिळाले महत्वाचे धागेदोरे, अजून दोघांना केली अटक, ‘ती’ माहिती आली समोर..


Sharad Mohol पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकणात पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे. आरोपींना पिस्तूल पुरवणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यामुळे शरद मोहोळ हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता १० वर पोहोचली आहे.

धनंजय मारुती भटकर आणि सतीश संजय शेडगे अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी खून करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल आरोपींना पुरवले असल्याची माहिती आहे. Sharad Mohol

गुंड शरद मोहोळचा ५ जानेवारी रोजी भरदिवसा सुतारदरा येथील घरासमोर खून करण्यात आला होता. त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व त्याच्या इतर साथीदारांनी गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती. पूर्ववैमन्यासातून ही हत्या झाल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुन्ना पोळेकरचे शरद मोहोळसोबत मोठे वाद झाले होते. जमिनीवरून आणि आर्थिक गोष्टीवरून दोघांमध्ये वाद झाले होते. साहिल पोळेकरला मामाच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. मामावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी साहिलने हे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासातून समोर आलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!