Maharashtra Cabinet Meeting : राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची पदे टप्प्याटप्प्याने भरण्यास मान्यता..

Maharashtra Cabinet Meeting मुंबई : राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त २८६३ पदे तसेच सहाय्यभूत ११ हजार ६४ पदे निर्माण करण्याबाबत व ५ हजार ८०३ मनुष्यबळ बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास आणि या मंजूर पदांवरील भरती टप्प्याटप्प्याने करण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

नॅशनल कोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम कमिटी (NCMSC) ने शिफारस केलेल्या दुय्यम न्यायाधीशांच्या ३२११ पदांची शिफारस करतांना महाराष्ट्रात २०१२पदे मंजूर होती. त्यानंतर ३४८ पदे मंजूर करण्यात आली असून सद्य:स्थितीत मंजूर पदसंख्या २३६० एवढी आहे. Maharashtra Cabinet Meeting
त्यास अनुसरुन आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये दुय्यम न्यायालयातील न्यायाधीशांच्या ३२११ पदांपैकी महाराष्ट्रात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त २८६३ पदे तसेच त्यांचेसाठी सहाय्यभूत ११ हजार ६४ पदे निर्माण करण्याचा व ५८०३ मनुष्यबळ बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मंजूर पदांवरील भरती ही टप्याटप्याने करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
