Sugarcane Worker : ऊसतोड मजुरांना येणार चांगले दिवस, शरद पवार व पंकजा मुंडे यांच्या लवादाने घेतला ३४ टक्के दरवाढ करण्याचा निर्णय…


Sugarcane Worker : ऊसतोडणी मजुरांना ऊस तोडणीच्या मजुरीत ३४ टक्के वाढ आणि मुकादमाच्या दलालीत (कमिशन) एक टक्क्यांनी वाढ करण्यात आली. साखर आयुक्तालयात झालेल्या बैठकीत हा ऊसतोडणी मजूर आणि कारखानदारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्या लवादाने पुढील तीन वर्षांसाठी हा निर्णय घेतला.

या बैठकीस शरद पवार, पंकजा मुंडे यांच्यासह, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, सुरेश धस, सुखदेव सानप आदी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून ऊसतोड मजुरांमध्ये असंतोष खदखदत होता, त्या ऊस तोडणी मजुरीच्या संदर्भातील दरवाढीचा निर्णय घेण्यात आला असून, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लवादाने हा निर्णय जाहीर केला. साखर आयुक्तालयात झालेल्या बैठकीत 34 टक्के दरवाढीवर एकमत झाले पुढील तीन वर्ष ही दरवाढ राहणार आहे. Sugarcane Worker

नव्या झालेल्या दरवाढीनुसार नवे दर असे असणार आहेत, यामध्ये यापूर्वी बैलगाडी साठी प्रतिटन २३७ रुपये असा दर होता, तो आता ३१७ रुपये १९ पैसे असा राहणार असून, डोकीसेंटरसाठी यापूर्वी २३७ रुपये तोडणी दर मिळत होता, तो आता 366 मिळणार आहे.

गाडी सेंटर साठी यापूर्वी 304 रुपये मिळायचे, ते आता ४०८ रुपये ४१ पैसे मिळणार आहेत. याखेरीज वाहतुकीसाठी पहिल्या किलोमीटरपर्यंत १३५ रुपये ८८ पैसे हा दर मिळणार असून, यापूर्वी तो १०१ रुपये मिळत होता.

त्यानंतर प्रति किलोमीटरचे वाहतूक ही १९ रुपये ८३ पैसे मिळणार आहे. दुसरीकडे मुकदमांनाही कमिशन वाढवून देण्यात आले असून यापूर्वी १९ टक्के कमिशन होते, त्याचा वीस टक्के कमिशन राहणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!