Jitendra Awhad : राम हा मांसाहारी होता! जितेंद्र आव्हाड त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ठाण्यात तुफान राडा, अजित पवार शरद पवार गट आमनेसामने..

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता. त्याने १४ वर्ष वनवास भोगला होता मग ते शाकाहारी कसे असू शकतात?, असा सवाल त्यांनी केला. सध्या त्यांच्या विधानाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता सर्वच स्तरातून टीका केली जात आहे.
आपण अनेक इतिहास लक्षात ठेवत नाही, वाचत नाही. राजकारणात वाहून जातो. राम हा आमचा, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. १४ वर्ष जंगलात असणारे राम शिकार करायचे असे वक्तव्यही जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. Jitendra Awhad

जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात मोठा संघर्ष उफाळला आहे. आव्हाडांच्या या वक्तव्यनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात थेट जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर निदर्शने देण्यास सुरुवात केली. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार आणि अजित पवार गट एकमेकांच्या विरोधात पहिल्यांदाच आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे.
अजित पवार गटातील कार्यकर्ते जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानाच्या काही अंतरावर रामाची आरती करण्यासाठी आले होते. रामाची आरती करून आव्हाडांचा निषेध नोंदणीसाठी आले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. मात्र पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.