Accident News : न्यू इयर पार्टी जिवावर बेतली ! सहा मित्रांचा अपघातात जागीच मृत्यू , कुंठ घडली घटना..!!

झारखंड : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झारखंडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. नवीन वर्षांचे जल्लोषात स्वागत करून पिकनिकला जाणाऱ्या तरूणांवर काळाने घाला घातला आहे. एका भीषण रस्ता अपघातात सहा मित्रांचा मृत्यू झाला आहे. ही घटना झारखंड येथील बिष्टुपूर पोलिस स्टेशन हद्दीतील सर्किट हाउस भागात झाली.

मिळालेल्या माहिती नुसार, नव्या वर्षाच्या स्वागताची पार्टी करून हे तरूण घरी परतत असताना ही घटना घडली. रिपोर्ट्सनुसार कारमध्ये बसलेले सर्व तरुण दारूच्या नशेत होते. सकाळ होताच घटनास्थळी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.


वेगात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटल्याने ती पहिल्यांदा डिव्हायडला धडकली आणि नंतर एका झाडावर आदळून उलटली. या कार दुर्घटनेत कारमधील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. धडक इतकी जबरदस्त होती की, याचा आवाज खूप दूरपर्यंत ऐकू आल्याने लोक घरातून बाहेर धावत आले.
स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले, तसेच जखमींना बाहेर काढण्यात आलं. पोलिसांकडून हे तरूण कुठे पार्टी करण्यासाठी गेले होते याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, मृतदेहांना कारमधून बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. सर्व मृत तरुण हे आरआयटी पोलिस स्टेशन हद्दीतील कुलुप्तांग येथील आहेत. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
