Pune News : अल्पवयीन मुलीशी केलं लग्न, मुलगी दुसऱ्यांदा गरोदर झाल्याने धक्कादायक प्रकार झाला उघड..


Pune News पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

अल्पवयीन युवतीशी लग्न करून जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर तिला दीड वर्षांचा मुलगा असून ती दुसऱ्यांदा १४ आठवड्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी १७ वर्ष ११ महिने वयाच्या पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून नवऱ्यासह अन्य चार नातेवाईकांविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune News

पती रुपेश कांबळे (वय. ३३), मावस बहीण जया गायकवाड (वय. ४०), सासू रंजना कांबळे, दीर जितेश कांबळे आणि नणंद सोमी खुपटे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, पीडित तरूणी सध्या १७ वर्ष ११ महिन्यांची आहे. तिचे हिरामण गवळीवाडा, येरवडा येथील ३३ वर्षीय तरुणासोबत लग्न लावण्यात आले.

यानंतर आरोपी पती रुपेश कांबळ संबंधित युवती ही अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील देखील, त्याने जबरदस्तीने युवतीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून तीला एक दीड वर्षाचा मुलगा देखील आहे.  यानंतर संबंधीत युवती पुन्हा १४ आठवड्यांची गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला.

यानंतर अल्पवयीन पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पती रुपेश, मावस बहीण जया गायकवाड, सासू रंजना कांबळे, दीर जितेश कांबळे आणि नणंद सोमी खुपटे यांच्याविरोधात पोक्सो सह बाल विवाह प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!