Pandharpur Accident News : पंढरपूरमध्ये मृत्यूतांडव! कार अन् ट्रकचा भीषण अपघात, चार जण जागीच ठार..

Pandharpur Accident News : राज्यातील भीषण अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पंढरपुरमधील करमाळ्याजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात कर्नाटकमधील गुलबर्गा येथील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
श्रीशेल कुंभार, शशिकला कुंभार, जेमी कुनशामत, शारदा हिरेमठ अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.
करमाळा नगर महामार्गावरील पांडे गावाजवळ हा अपघात झाला आहे. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताची माहिती मिळतात तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्यास सुरुवात केली. Pandharpur Accident News
दरम्यान अपघाताच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. काल रात्री समृद्धी महामार्गावर देखील भीषण अपघात झाला आहे. वन्य प्राणी कारला अचानक आडवा आल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते.