Kerala Bridge Collapse : मोठी बातमी! केरळमध्ये ख्रिसमस साजरा करताना मोठी दुर्घटना, पूल कोसळून अनेकजण जखमी…


Kerala Bridge Collapse : केरळची राजधानी तिरुवनंतपुरममध्ये सोमवारी रात्री ख्रिसमस सोहळ्यादरम्यान उभारण्यात आलेला एक तात्पुरता पूल कोसळला, त्यात अनेक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, या अपघातामध्ये ७-८ जण जखमी झाले आहेत, जखमींमध्ये काहींना गंभीर दुखापत झाली आहे तर काहींना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे, तर एका महिलेचा पाय फ्रॅक्चर झाल्याची देखील माहिती मिळाली आहे.

ख्रिसमस साठी बनविण्यात आलेल्या या पुलाची उंची ५ फूट होती. एका वेळी मोजक्याच लोकांना भेट देता येईल असा हा पूल होता मात्र अनेक जण एकत्र पुलावर चढले, त्यामुळे अपघात झाला. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. Kerala Bridge Collapse

हा अपघात रात्री 9 च्या सुमारास झाला, जेव्हा अनेक लोक एकाच वेळी पुलावर चढल्याने हा पूल कोसळला. जास्त भारामुळे पूल एका बाजूला झुकला, त्यामुळे त्यावर उभे असलेले लोक खाली पडले.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, हा पूल नाताळच्या सेलिब्रेशनसाठी बांधण्यात आला होता. धबधबा आणि येशूचा जन्म तसेच इतर सजावट पाहण्यासाठी ही भिंत ओलांडून पलीकडे जाण्यासाठी हा पूल बांधण्यात आला होता.

दरम्यान, पुलाची उंची सुमारे पाच फूट असल्याचे त्यांनी सांगितले. या पुलावरून काही कमीच लोक जाऊ शकत होते. मात्र अनेक जण एकत्र पुलावर चढले, त्यामुळे अपघात झाला. त्यांनी सांगितले की, जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!