धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण !


पुणे : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. जेएन.१ या नव्या सब व्हेरियंटने देशभरात हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे देशात चिंतेचं वातावरण आहे. त्यातच राज्यातल्या एका महत्त्वाच्या मंत्र्याला कोरोनाने घेरले आहे.

मला सध्या फारसा त्रास नाही, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मागील ४ दिवसांपासून क्वारंटाईन राहून योग्य उपचार घेत आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. मी लवकरच बरा होऊन आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा दाखल होईल. ते सध्या पुण्यातील मॉडर्न कॉलनीमध्ये असलेल्या घरी कॉरनटाइन आहेत. घरीच त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहे.

मी लवकरच बरा होऊन आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा दाखल होईल. सध्या थंडीचे वातावरण असून कोविडच्या नव्या आवृत्तीने शिरकाव केला आहे. त्यादृष्टीने घाबरून न जाता सर्वांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.

मागील चार ते पाच दिवसांपासून धनंजय मुंडे यांना खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ते पुण्यातील आपल्या घरी विलगीकरणात आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर घरीच औषध उपचार सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!