Pune Crime : भाडेकरुकडून घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली, पुण्यातील धक्कादायक घटना..

Pune Crime पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
एका अल्पवयीन मतीमंद मुलीवरील बलात्काराची घटना ताजी असतांना आणखी एक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाडेकरुकडून घरमालकाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटने उघडकीस आली आहे. Pune Crime
याप्रकरणी समर्थ पोलिसांनी भाडेकरु तरुणासह त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सिजू समीर शेख (वय. २६), त्याची पत्नी सोफियाना (वय २५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत . याप्रकणी मुलीने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी शेख दाम्पत्य पीडित मुलीच्या इमारतीत भाडेकरु म्हणून राहत होते. आरोपी सिजू शेखने अल्पवयीन मुलीशी ओळख केली.
यानंतर तिच्यावर त्याने बलात्कार केला. तिचे आक्षेपार्ह छायाचित्र देखील त्याने काढले. दरम्यान, ही बाब मुलीच्या वडिलांना कळली. आरोपी शेखने मुलीच्या वडिलांना देखील धमकावले.
तिचे छायाचित्रे सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. एवढेच नाही तर मुलीला पळवून नेण्याची देखील धमकी दिली. मात्र, मुलीच्या वडिलांनी त्याच्या धमक्यांना न जुमानता या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्याला आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर करत आहेत.