Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा अल्टिमेटम काही तासांत संपणार, मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार?, राज्याचे लागले लक्ष..


Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपणार आहे. त्यामुळे जरांगे आरक्षणाबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे

अल्टिमेटम संपण्यापूर्वी जरांगे पाटील आज बीडमध्ये सभा घेणार आहे. मराठा समाजाच्या या सभेपूर्वी बीडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भव्य रॅली निघणार आहे.

ही रॅली सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे चौकात येईल, तिथून अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून रॅली जालना रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात येईल. सभेपूर्वी बीडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भव्य अशी रॅली निघणार आहे. Maratha Reservation

ही रॅली सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे चौक याठिकाणी येईल, तिथं अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून रॅली जालना रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणार आहे. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून रॅली बार्शी रोड मार्गे सभास्थळाकडे जाईल.

तिथे मनोज जरांगे मराठा समाजाला संबोधित करणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याशिवाय सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार का? हे देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!