आईने आपल्या १५ महिन्यांच्या मुलाला तलावात फेकलं, भयंकर कारण आलं समोर…


कर्नाटक : कर्नाटकमध्ये आईनेच १५ महिन्याच्या मुलाला पाण्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. या हत्येमागे महिलनेचे अनैतिक संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे.

भाग्यम्मा (वय .२१) असे महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, कणवा तलावात आपल्या १५ महिन्यांच्या मुलाला फेकून देनाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. ती पतीपासून विभक्त झाली आहे. महिला चन्नापटना तालुक्यातील बनगहल्ली येथे तिच्या आईसोबत राहत असतांना त्यावेळेस ती कपडे धुण्याच्या बहाण्याने घरातून गेली व तीने हे कृत्य केले.

त्यानंतर ती घरी परत आल्यानंतर मुलगा तलावात पडल्याचे सांगितले. या हत्येमागे महिलेचे अनैतिक संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. आईच बनली वैरीण अनेक घटना समोर येत असतात. या घटनेने एकच खळबळ उडाली.

दरम्यान आपल्या अनैतिक संबधासाठी पोटच्या मुलाला फेकून दिल्याची घटना धक्कादायक आहे. पोलिसांनी महिलेला अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!