Crime News : धक्कादायक ! एकाच कुटूंबातील ६ जणांची निर्घृण हत्या ..!!


(Crime News) : तेलंगणातील निजाबाद जिल्ह्यातून एक मोठी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एकाच कुटुंबातील ६ जणांची आठवडाभरात निर्घृण हत्या करण्यात आली आहे. संपत्तीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ डिसेंबरपासून आठवडाभरात या ६ जणांची हत्या करण्यात आली आहे. आरोपी प्रशांत याने प्रथम त्यांचा मित्र प्रसाद याची हत्या केली.

हत्येनंतर त्याने प्रसादचा मृतदेह डिचपल्ली येथे महामार्गाच्या कडेला पुरला. त्यांनतर प्रशांतने प्रसादाच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीचीही हत्या केली. हत्येनंतर त्यानं तिचा मृतदेह बसरा येथील गोदावरी फेकून दिला.

पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. त्यानंतर मेडक जिल्ह्यात एका महिलेचा जळालेला मृतदेह सापडला. या प्रकरणी अधिक तपास केला असता दोन्ही मृत महिला हत्या झालेल्या सख्ख्या बहिणी असल्याचे उघडकीस आले.

दोन्ही मृत मुलांचे पालक बेपत्ता असून त्यांचा कुठेही पत्ता नाही. तसेच त्यांच्या कामारेड्डी जिल्ह्यातील घराला कुलूप आहे. त्यांचा खून झाला असावा, असा संशय चौकशीदरम्यान नातेवाईकांनी व्यक्त केला.

दरम्यान, नातेवाईकांच्या माहितीनुसार, मुलांच्या वडिलांनी त्यांची सगळी संपत्ती मालमत्ता एकाच नावावर केली होती, जी आता परत देण्यात त्यांनी नकार दिला. त्यावरून खूप वाद झाले. याच संपत्तीच्या वादातून ही हत्या झाली असावी, नातेवाईकांचे मत आहे.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!