अजित पवारांमुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला, सदाभाऊ खोत यांचे मोठे वक्तव्य…!

पुणे : माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार अजित पवार यांच्यामुळेच होत नाही. अजित पवारांमुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे. कारण त्यांचा मुहूर्त अजून ठरत नाही. सध्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत सर्वजण आहेत.

विरोधकांकडूनही वारंवार विस्ताराबाबत दावे करण्यात येत आहेत. सध्या एका एका मंत्र्यांकडे अनेक खाती देण्यात आली आहेत. दरम्यान यासाठी सदाभाऊ खोत यांनी अजित पवार यांनाच कारणीभूत ठरवले आहे. यामुळे सध्या याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार यांचाच मुहूर्त अजून ठरत नाही. शपथविधी कधी घ्यायचा? हे नक्की झालं की मंत्रिमंडळ विस्तार होईल, असा टोला त्यांनी लगावला. आता अजित पवार काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी सात महिने झाले तरी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, यावरून अजित पवार यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला होता. नऊ महिन्यात बाळ जन्माला येत, पण इथे सरकारला सात महिने झाले तरी विस्तार होत नाही, असे ते म्हणाले होते.