Pune Police MCOCA Action : उरुळी कांचन परिसरात दहशत माजवणाऱ्या वैभव उर्फ गोट्या तरंगे टोळीवर मोक्का, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची ९९ वी संघटीत मोक्का कारवाई..


Pune Police MCOCA Action : उरुळी कांचन : हातातून मोबाईल घेतल्याच्या कारणावरून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी करणाऱ्या वैभव उर्फ गोट्या तरंगे व त्याच्या इतर २ साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत ९९ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे.

ही घटना ५ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथील दत्तवाडी येथे घडली होती .याप्रकणी २५ वर्षीय तरुणाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Pune Police MCOCA Action

त्यानुसार, वैभव उर्फ गोट्या राजाराम तरंगे (वय. २० रा. दत्तवाडी, उरुळी कांचन), सागर अरुण सिन्हा (वय. १९ रा. उरुळी कांचन), यश लोणारी (रा. तुपे वस्ती, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करुन तरंगे व सिन्हा यांना अटक केली आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२),३ (४) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी परिमंडळ- ५ पोलीस उपायुक्त आर राजा यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता.

दरम्यान, या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!