Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पाळीव कुत्र्याला जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार..

Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पाळीव कुत्र्याला जीव मारण्याची धमकी देऊन पुण्यात एका नराधमाने २८ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाच दिवस घरात कोंडून ठेवून तिला अमानुष मारहाण करून केली आणि पाच दिवस लैंगिक अत्याचार केले आहेत. Pune Crime
संग्राम कोरेकर असे आरोपीचे नाव असून कोंढवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका महिलेने कुत्रा पाळला आहे. पीडित महिला पाळीव प्राण्यांवर जीवापाड प्रेम करते. याचा फायता घेत आरोपी संग्राम कोरेकरने कुत्र्याला गॅलरीतून फेकून ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केले आहेत.पीडित महिलेच्या डोक्यात कठीण वस्तूने मारहाण केली.

त्यानंतर जखमी अवस्थेत तिला स्वत:च्या घरात कोंडून ठेवलं. नराधमाने पीडित महिलेवर पाच दिवस अमानुष मारहाण करत अत्याचार केले आहेत. या प्रकरणी आरोपी विरोधात कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.