Ravindra Berde : सिनेसृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन, ७८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..

Ravindra Berde : मराठी सिनेसृष्टीत आपल्या भूमिकांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील बऱ्याच वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाने ते त्रस्त होते. काही महिन्यांपासून टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

दोन दिवसांपूर्वीच बेर्डे यांना रुग्णालयातून घरी आणले होते. अचानक त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
रविंद्र बेर्डे यांची अजून एक ओळख म्हणजे ते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ होते. त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत देखील त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांची नभोवाणीशी आणि १९६५ च्या काळात नाट्यसृष्टीशी नाळ जोडली गेली. त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. Ravindra Berde

त्यांनी खतरनाक,हमाल दे धमाल, हाच सुनबाईचा भाऊ, चंगू मंगू, एक गाडी बाकी अनाडी, थरथराट, उचला रे उचला, यांसारख्या ३०० पेक्षा जास्त मराठी चित्रपट आणि जवळपास पाच हिंदी चित्रपटात काम केलं आहे.
त्यांना १९९५ मध्ये व्यक्ती आणि वल्ली या नाटकादरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर २०११ पासून ते कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा सामना करत होते.