Trending News : माझा भाऊच माझा नवरा आहे!! महिलेने सांगितले विचित्र फॅमेली सिक्रेट, नेमकं काय आहे प्रकरण..?


Trending News : एका महिलेने तिच्या आयुष्यातील सर्वात मोठे सिक्रेट सोशल मीडियावर सांगितले आहे. तिच्या कुटुंबाचे सिक्रेट ऐकून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. अलबामा येथे राहणाऱ्या लिंडसे आणि कॅड ब्राउन यांनी २०१३ मध्ये लग्न केले होते. त्यांना दोन मुलंदेखील आहेत.

लिंडसे आणि कॅड हे नात्याने एकमेकांचे भाऊ-बहिण लागतात. लिंडसेने सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दल सांगितले आहे. मात्र, नेटकऱ्यांना त्यांचे नाते काही रुचले नाही. त्यांनी तिच्या पोस्टवर उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लिंडसे हिने सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टनुसार, मी आणि माझा पती आम्ही एकमेकांचे सावत्र भाऊ आहोत. पण आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडून काहीच चुक केली नाहीये. कारण आम्ही आधीपासून भाऊ-बहिण नाहीयेत. आम्ही कॉलेजमध्ये असताना पहिल्यांदा एकमेकांना भेटलो होतो. Trending News

लिंडसेने पोस्टमध्ये लिहले आहे की, जेव्हा मी १४ वर्षांची होती तेव्हा माझ्या खिडकीत मी एका अज्ञात मुलाला पाहिले होते. आम्ही कधीच एकमेकांना डेट केले नाही. आता १५ वर्षांनतर माझा सावत्र भाऊच माझा नवरा आहे. पण त्यांच्या या प्रेमकहाणीत अनेक ट्विस्टदेखील आहेत.

लिंडसेने दावा केला आहे की, लोक जितका विचार करताहेत तितक काहीच विचित्र नाहीये. कारण भाई-बहिण व्हायच्या आधीच ते डेट करु लागले होते. आमच्या आई-वडिलांनी आधी लग्न नव्हते केले. त्यांच्या आधीच आम्ही लग्न केले होते. जर आम्ही नसतो तर त्यांनी कधीच लग्न केलं नसते.

लिंडसे तिच्या पोस्टमध्ये पुढे म्हणते की, आम्ही २००७ मध्ये कॉलेजमध्ये भेटलो होते. तेव्हापासून कॅड माझ्याशी बोलायचा प्रयत्न करायचा एकदा तो थेट माझ्या बेडरुममध्ये शिरला होता. तेव्हा त्याच रात्री माझ्या आईने त्याला पकडले आणि माझ्यापासून लांब राहण्याची धमकी दिली. त्यानंतर आम्ही थेट २०१३मध्ये सोशल मीडियावर पहिल्यांदा भेटलो.

मला आणि कॅडला लग्न करायचे होते. त्यासाठी मी माझ्या आईचा विरोध झुगारुन त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी गेले. तेव्हा नुकताच त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. तेव्हा माझी आईदेखील माझ्या मागोमाग आली होती.

तेव्हाच तिची आणि कॅडच्या वडिलांची पहिली भेट झाली. काही महिन्यांनी कॅड मिलिट्री ट्रेनिंगसाठी गेला पण त्याच काळात माझी आई आणि माझे वडिल डेट करायला लागले. कॅड परत आल्यानंतर दोन आठवड्यातच आम्ही लग्न केले, असे लिंडसे हिने म्हटले आहे.

आमच्या लग्नानंतर माहिती झाल्यानंतरही एक वर्षांनंतर आमच्या आई-वडिलांनी लग्न केले. तेव्हापासून आम्ही एकत्रच राहतो. पण लोक मला सावत्र भावासोबत लग्न केलं म्हणून टोमणे मारतात, अशी खंत लिंडलेने व्यक्त केली आहे. या घटनेने सगळीकडे चर्चा सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!