Crime News : लग्नाच्या आमिषाने वारंवार शरीरसंबंध, अन् नंतर फोटो व्हायरल…, बारामती येथील धक्कादायक घटना…


Crime News बारामती : विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्या कुटुंबापासून विभक्त करीत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बारामती तालुका पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूरज राजेंद्र पिसाळ (रा. यदू पाटीलनगर, तांदूळवाडी, बारामती) याच्याविरोधात, तर त्याला साहाय्य केल्याप्रकरणी चित्रा राजेंद्र पिसाळ असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी तांदूळवाडीत राहणार्‍या महिलेने फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी कुटुंबासह तांदूळवाडीत राहत असताना तिच्या दुकानात आरोपी सूरज हा किराणा माल व अन्य साहित्य घेण्यासाठी येत होता. त्यांने तिचा मोबाईल नंबरही घेतला. त्यांनंतर तो तिच्या घरी गेला असून थोड्याच वेळाने त्याने तिला शीतपेय प्यायला दिले. त्यामुळे फिर्यादीला गुंगी आली. शुद्धीत आल्यावर सूरजने इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबंध केल्याचे तिला आढळले. Crime News

तसेच तिने शीतपेयात काय टाकले होते,असे विचारात असत्तांना त्याने दोघांचे मोबाईलमध्ये काढलेले अश्लील फोटो तिला Crime News दाखविले. तू  माझ्यासोबत लग्न कर, मी तुझ्या मुलाला सांभाळतो, असे आश्वासन त्याने तिला दिले. त्यानंतर १५ दिवसांनी सूरजने पुन्हा तिला फोन करीत बारामतीत भेटायला बोलावले. ‘नाही आली, तर अश्लील फोटो सगळीकडे व्हायरल करेन,’ अशी धमकी दिली. फिर्यादीला दुचाकीवरून शहरातील एका लॉजवर घेऊन गेला व तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले.त्यानंतर वारंवार वेगवेगळ्या लॉजवर तो तिला नेत होता.

आरोपी याने लग्न करतो, असे म्हणत त्याने माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजजवळ त्याच्या मावशीकडे तिला व तिच्या मुलाला नेले. तेथे त्याची आई चित्रा त्यांच्यासोबतच राहत होती. दोन महिने त्याने तिला तेथे ठेवले. लग्नाचा विषय काढला की, सूरज व त्याची आई दोघे मिळून हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करायचे. मुलाला मारण्याची धमकीही तिला दिली जात होती. ऑक्टोबरमध्ये त्याने तहसील कार्यालयासमोर दोन स्टॅम्प पेपरवर तिच्या बळजबरीने सह्या घेतल्या.

माळेगावमधील जाधववस्ती येथे तिला ठेवत तेथेही तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. कामानिमित्त बाहेर चाललो असे तिला सांगून बाहेर पडला. त्यानंतर तो घरी आला नाही. त्याला फिर्यादीने वारंवार फोन केले. त्याने फोन घेत ‘मी येणार नाही, तुझे तू बघ, असे उत्तर तिला दिले. घडलेला प्रकार फिर्यादीने तिच्या मामाला सांगितल्यानंतर याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल केली.Crime News

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!