Junior Mehmood Passed Away : अखेर कॅन्सरशी झुंज अयशस्वी, ज्युनिअर महमूद यांचे निधन, वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..

Junior Mehmood Passed Away : मागील काही दिवसांपासून कॅन्सरशी लढा देणारे ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांची आजाराशी झुंज अयशस्वी ठरली. ज्युनिअर महमूद यांचे गुरुवारी रात्री निधन झाले आहे. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ज्युनिअर मेहमूद यांच्या निधनाच्या बातमीला त्यांचे जवळचे मित्र सलीम काझी यांनी दुजोरा दिला आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर डॉक्टरांनी ४० दिवसांपेक्षा जास्त दिवस ते जिवंत राहणार नाही, असे स्पष्ट सांगितले होते. त्यांना कॅन्सर झाला होता. त्यांचे नाव नईम सय्यद होते. कॉमेडियन मेहमूद यांनी त्यांना हे नाव दिले होते. जॉनी लीवर यांनी त्यांना मदत केली होती. Junior Mehmood Passed Away
यापूर्वी जॉनी लिव्हर यांनी ज्युनिअर मेहमूदसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओत ज्युनिअर मेहमूद यांच्या बिघडलेल्या प्रकृतीची माहिती देत त्यांच्यासाठी दुवा मागण्याचे आवाहन केले होते.

प्रिय ज्युनियर महमूदला ओळखणारे आणि प्रेम करणारे ७०० लोक आजारी अवस्थेत त्याला भेटायला आले होते, त्यात जॉनी लीव्हर, सचिन पिळगावकर आणि जितेंद्र यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश होता.

ज्युनिअर महमूद यांचे जवळचे मित्र सलाम काजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महमूद यांना फुफ्फुसं आणि लीव्हरमध्ये कॅन्सर होता. त्याशिवाय त्यांच्या आतड्यांमध्येही ट्यूमर असल्याचं समोर आले होते. त्यांचा कॅन्सर चौथ्या स्टेजला होता.
त्यांची तब्येत सतत खालावत चालली होती. ते मागील काही दिवस व्हेटिंलेटर सपोर्टवर होते. अखेर गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी दुपारी १३ वाजता ज्युनिअर महमूद यांच्यावर सांताक्रूझ येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.