Lalit Patil Drugs Case : मोठी बातमी! ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण देवकाते यांना अटक..

Lalit Patil Drugs Case पुणे : ड्रग्समाफिया ललीत पाटील प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी जसजसी पुढे सरकत आहे तशी आरोपींची संख्येतही वाढ होताना दिसत आहे. अशातच आता ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना अटक करण्यात आली आहे.

ड्रग माफिया ललित पाटील पलायन प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करण्यात आली होती. ललित पाटील प्रकरणात दोषी आढळलेल्या ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना पदमुक्त करुन त्यांच्या विभागीय चौकशीचे तर आर्थोपेडीक सर्जन डॉक्टर प्रविण देवकाते चौकशी यांच निलंबन करण्यात आले होता. Lalit Patil Drugs Case


ड्रग माफिया ललित पाटीलला मदत केल्याचा ज्यांचावर आरोप होत होता ते ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चार सदस्यीय वैद्यकीय समितीनं दोषी ठरवले आहे.
या समितीच्या अहवालानुसार ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी त्याला डॉक्टर ठाकूर यांची मदत होत होती. डॉक्टर ठाकूर यांच्या सांगण्यावरून डॉक्टर प्रवीण देवकाते हे ललित पाटील आजारी असल्याचे खोटे रिपोर्ट तयार करत होते. या दोन्ही डॉक्टरांचे हे कृत्य वैद्यकीय करताना डॉक्टर घेत असलेल्या शपथेला आणि वैद्यकीय व्यवसायाला अनुसरून नव्हते.
दरम्यान, पुणे पलिसंच्या गुन्हे शाखेने काल रात्री उशीरा डॉ. प्रवीण देवकाते यांना अटक केली. डॉ प्रवीण देवकाते हे ससून रुग्णालयात ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत होते. देवकाते यांनी ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढवला, अशी माहिती तपासातून समोर आली. याप्रकरणी अजून काय नवीन खुलासे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
