PM Narendra Modi : नरेंद्र मोदी ४ डिसेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर, शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे करणार अनावरण..


PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ४ डिसेंबर रोजी कोकणात येणार असून ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यावेळी ते सिंधुदुर्ग किल्ल्यावर देखील जातील. त्याचप्रमाणे तिथे असलेल्या एकमेव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात जाऊन दर्शन देखील घेणार आहेत.

यानिमित्ताने ४ डिसेंबर रोजी सिंधुदुर्गातील पर्यटन देखील पूर्णपणे बंद राहणार आहे. या दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. हे अनावरण झाल्यानंतर ते तारकर्ली येथील नौसेना दिनानिमित्त होणाऱ्या प्रात्यक्षिकांना हजर राहतील.

मालवण येथे नौदल दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सर्व दिग्गजांचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे तारकर्ली केंद्र तयारी करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. PM Narendra Modi

त्यासाठी सर्व पातळीवर सुधारणा करण्यात आल्या आहे. स्वच्छता, सुभोभिकरण यांसारख्या गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नौदलाचे अधिकारी, विदेशी पाहुणे देखील उपस्थित राहतील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!