Ajit Pawar : मोठी बातमी! मराठा समाजाचा अजित पवारांना धसका, छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द, नेमकं कारण काय?

Ajit Pawar : मागील काही दिवसापासून मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्र्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळयांच्यामध्ये वाद सुरू आहेत, अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील मराठा बांधवांचा विरोध होत आहे.
मराठा समाजाने अजित पवारांच्या संभाजीनगर दौऱ्याला विरोध केला होता. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आजचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
आज अजित पवार यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन सकाळी १०:३० वाजता होणार होते. परंतु, त्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा दौरा रद्द झाला आहे, असे सांगण्यात आले आहे.
हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे अजित पवार यांनी छत्रपती संभाजी नगरचा दौरा रद्द केला असल्याची माहिती समोर येत आहे. आमदार सतीश चव्हाण यांच्या माध्यमातून आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विकास कामांचा उद्घाटनाचा आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते होणार होते. याचवेळी त्यांच्या याच दौऱ्याला मराठा आंदोलकांनी विरोध केला होता. त्यामुळे, मराठा समाजाच्या विरोधामुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.