Breaking News : पुण्यातील नऱ्हे परिसरात मध्यरात्री भीषण आग, १० वाहने जळून खाक; लाखो रुपयांचे नुकसान…


Breaking News : पुण्यातील नऱ्हे परिसरात असलेल्या अंबामाता मंदिराजवळील परफेक्ट ऑटो गॅरेजला मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. या आगीमध्ये गॅरेजमध्ये असलेली १० वाहने जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.

या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही. Breaking News

मात्र, गॅरेजमध्ये असलेली १० वाहने पूर्णत: जळून खाक झाली आहे. यामध्ये ४ चारचाकी वाहने आणि ६ दुचाकी वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, २३ नोव्हेंबर रोजी देखील शहरातील वेस्टएंड मॉलमध्ये मोठी आग लागली होती. त्यावेळी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत मॉलमधील नागरिकांना सुखरुप बाहेर काढलं होतं. ही घटना ताजी असतानाच नऱ्हे परिसरात असलेल्या परफेक्ट ऑटो गॅरेजला आग लागल्याने खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!