Pune Crime : पुण्यात उडाली खळबळ! झोपमोड केली म्हणून भाडेकरूने केली घर मालकाची हत्या, हॉर्न वाजवला अन्…


Pune Crime पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.

घरासमोर दुचाकीचे जोरात हॉर्न वाजवून झोपमोड केल्यामुळे भाडेकरुने थेट घरमालकाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील हडपसर रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात ही घटना घडली. दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. Pune Crime

संतोष राजेंद्र धोत्रे असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. तर दादा ज्ञानदेव घुले असे हत्या झालेल्या घरमालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी धोत्रे हा घुले यांच्या चाळीत भाडेकरू आहे. सोमवारी दुपारी धोत्रे दारू पिल्यानंतर घरात झोपायला गेला. त्यावेळी घुले यांनी घरासमोर दुचाकीचा जोरजोराने हॉर्न वाजवला. त्यामुळे झोपमोड झाल्याने धोत्रेने घुले यांना मारहाण केली. धोत्रे याने त्यानंतर पार्किंगमधील पाण्याच्या टाकीत घुले यांना बुडवून खून केला.

दरम्यान, घुले रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार दिली. चौकशीदरम्यान घुले आणि धोत्रे यांच्यात सोमवारी भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!