मनोज जरांगेच्या भूमिकेला असाही पाठिंबा ! मनोज नावाच्या व्यक्तिला आधारकार्ड दाखवून मोफत जेवण ..!!

छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी लडवैय्या मराठा समाजाचे नेते मनोज -पाटील यांनी मोठा संघर्ष उभा केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे म्हणून मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला कोंडीत पकडले आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला केंद्र व राज्य सरकारची धावपळ उडाली आहे.

एक सामान्य माणूस प्रामाणिक व शुद्ध हेतू असल्यास काय करु शकतो , असा एक वस्तुपाठ जरांगे यांनी समाजापुढे मांडला आहे.त्यांच्या या आक्रमक आंदोलनाने सरकार पुरते निष्प्रभ होऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गतिमान प्रयत्न करु लागले आहे.अशा सर्व जरांगे यांच्या लढ्याने त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली असून मराठा समाज त्यांच्यासाठी निरनिराळ्या लुप्त्या लढवून या लढ्यास पाठबळ देत आहे. या लढ्यात एका हॉटेल व्यवसायानेचक्क मनोज नावाच्या व्यक्तिलाच मोफत जेवण देण्याला सुरुवात केली आहे.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड येथील अमृत हॉटेलचे मालक बाळासाहेब भोजने यांनी मराठा समाजाचे लडवैय्या नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी एक विलक्षण ऑफर आणली आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये जेवायला येणाऱ्या मनोज नावाच्या व्यक्तीला मोफत जेवण देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. मात्र यासाठी मनोज नावाच्या व्यक्तीला आपले आधार कार्ड सोबत आणावे लागेल, अशी अट घातली आहे.

या हॉटेलमध्ये ऑफरची चर्चा आता सोशल मिडीयाच चांगलीच चर्चेला येऊ लागली आहे. या अफलातून ऑफरला मनोज नावाची व्यक्ती असलेले लोकंही आधारकार्ड घेऊन मोफत जेवणाचा मनमुराद आनंद लुटत आहे.

अमृत हॉटेलचे मालक बाळासाहेब भोजने यांनी त्यांच्या हॉटेलबाहेर एक फलक लावला आहे, ज्यावर लिहिले आहे, “ज्या पद्धतीनं मराठा समाजाला अखंड महाराष्ट्रात एकत्र करून मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा वाढला.’ विशेषत: मनोज जरांगे पाटील सारख्या योद्ध्याने कोणत्याही राजकीय किंवा अन्य सत्तेच्या पाठिंब्याशिवाय समाजाचे भले करण्याचा निश्चय ध्येय आणि शुद्ध निस्वार्थी वृत्ती असेल तर काय करू शकते हे दाखवून दिले आहे. त्यांच्या कार्याला सलाम. मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही आमच्या हॉटेल अमृत प्युअर व्हेज पाचोड येथे ‘मनोज’ नावाच्या व्यक्तीला मोफत जेवण देत आहोत.