ओबीसी व्हायरल दाखल्यावरुन शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया !

बारामती : राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या निवासस्थानी दिवाळी पाडवा साजरा करीत आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) यांचा ओबीसी जातीचा दाखला सोशल मीडियावरुन व्हायरल झाला होता. या प्रकरणावरुन खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ओबीसी दाखल्यावरुन शरद पवार म्हणाले की , जन्माने दिलेली जात मी लपवू शकत नाही. सगळ्या जगाला माहिती आहे माझी जात काय आहे. राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील भाष्य केले आहे. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, मराठा तरुणांच्या भावनात तीव्र आहेत .त्यामुळे मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा व ओबीसी समाजामध्ये वाद नाही मात्र काही लोकांकडून जाणून बुजून असं वादाचा वातावरण निर्माण केल्याचा प्रयत्न केला जात आहे, असे देखील शरद पवार यांनी यावेळी म्हटले आहे