Pandharpur : वारकऱ्यांसाठी खुशखबर! कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक..

Pandharpur : यंदाच्या कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून भाविक पंढरपूर येथे दाखल होत असतात. कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूरसाठी रेल्वे प्रशासन विशेष गाड्या चालवणार आहे. मिरज-पंढरपूर आणि पंढरपूर-मिरजदरम्यान २० ते २७ नोव्हेंबरपर्यंत ४ फेऱ्यांमध्ये या विशेष गाड्या धावणार आहे.
गाडी क्रमांक ०१४४३ पंढरपूर येथून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटणार आहे. ही गाडी मिरजेत दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी पोहचणार आहे. त्याच दिवशी मिरज-पंढरपूर-मिरज गाडी क्रमांक ०१४४४ मिरजेतून दुपारी १ वाजून १० वाजता सुटेल.
ही गाडी पंढरपूर येथे सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी पोहोचेल. याशिवाय मिरज-पंढरपूर-मिरज ही विशेष रेल्वेगाडी २१ ते २५ नोव्हेंबर रोजी ४ फेऱ्यांत धावणार आहे. मिरज-पंढरपूर गाडी क्रमांक (०१४४५) मिरजेतून सकाळी ८ वाजता सुटेल व पंढरपूर येथे त्याच दिवशी सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल. Pandharpur
पंढरपूर-मिरज गाडी क्रमांक ०१४४६ पंढरपूर येथून सकाळी ११ वाजता सुटेल. मिरज येथे त्याच दिवशी दुपारी २ वाजता पोहोचेल. मिरज-कुर्डुवाडी-मिरज गाडी २१ ते २४ नोव्हेंबरपर्यंत चार फेऱ्यांत धावणार आहे. वारकऱ्यांनी वेळापत्रक पाहून तिकीटांची बुकिंग करावी, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.