Amit Thackeray : ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठं यश, अमित ठाकरे यांनी घेतला मोठा निर्णय…

Amit Thackeray : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल येऊन काही दिवस झाले आहेत. तर ग्रामपंचायतीत अधिकाधिक जागा महायुतीने जिंकल्या असल्याच्या अधिक चर्चा आहेत. तर महाविकास आघाडीला म्हणावी अशी कामगिरी करता आली नाही.

विदर्भ आणि मराठवाड्यात बीआरएसने यश मिळवून सर्वांना धक्का दिला. मनसेकडून काही ठिकाणी ग्रामपंचायतींची निवडणूक लढवली होती. मनसे नेते राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी पुणे जिल्ह्याकडे लक्ष दिले आहे.
पुणे जिल्ह्यांत या निवडणुकीत मनसेला यश मिळाले. त्यानंतर अमित ठाकरे यांना मोठा निर्णय घेणार आहेत. पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील पानशेत कुरण ग्रामपंचायतीमध्ये मनसेला यश मिळाले होते. आता अमित ठाकरे ही ग्रामपंचायत दत्तक घेणार आहेत. Amit Thackeray

पुणे येथील वेल्हा तालुक्यातील पानशेत कुरण ग्रामपंचायत अमित ठाकरे दत्तक घेणारे आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कुरण ग्रामपंचायतीवर मनसेची सत्ता आली.
त्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी ही ग्रामपंचायत दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. अमित ठाकरे यांच्या या निणर्यामुळे पानशेत कुरण गावाचा विकास होणार आहे.