Pune News : पुणे बाजार समितीत शेतमालाच्या चोऱ्या वाढल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांचे होतंय नुकसान…

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे-भाजीपाला, गूळ-भुसार बाजारात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. बाजारात सातत्याने चोऱ्या होत आहेत. ठरवून दिलेल्या संख्येत सुरक्षा रक्षक उपस्थित नसल्याने चोरीच्या घटना वाढल्या आहेत.

यामुळे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या चोऱ्यांबाबत अडते पोलिस आणि बाजार समितीकडे तक्रार देण्यास धजावत आहेत. याबाबत अडते असोसिएशन देखील मूग गिळून गप्प बसल्याचे सध्याचे चित्र आहे. Pune News
पुणे बाजार समितीमध्ये राज्य आणि परराज्यांतून मोठ्या प्रमाणावर फळे-भाजीपाल्यांची आवक होत आहे. बाजार आवारातील वाहतूक कोंडी आणि सुरक्षेसाठी भाजीपाला विभागात ८० सुरक्षा रक्षक आहेत.

तसेच गूळ-भुसार बाजारात ६३ सुरक्षा रक्षक आहेत. दोन्ही विभागात शेतमाल चोऱ्यांसह अनेक ठिकाणी कॅमेरा, एसीचे बॉक्स, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तोडफोडीच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. यामुळे पोलिसांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी गूळ-भुसार बाजारात नेहरू रस्त्यावरील दोन दुकाने फोडली होती. त्यापैकी एका दुकानातून सुमारे ३० हजार रुपयांची, तर भगवती ट्रेडर्स या दुकानातून सुमारे तीन लाखांची चोरी झाली होती.
बाजारातील कांदा, लसूण, आले या फळभाज्यांचे भाव वाढल्याने त्यांच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या चोऱ्यांमुळे बाजार घटक त्रस्त झाले असून शेतकरी, अडतदार यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
दरम्यान, याबाबत अडते असोसिएशन कोणतीही भूमिका घेण्यास तयार नसल्याचे अनेक आडते खासगीत सांगत आहेत. तर होणाऱ्या चोऱ्यांबाबत तक्रार देण्यास देखील अडते धजावत आहेत. यामुळे झालेले नुकसान शेतकऱ्यांना भरून द्यावे लागत आहेत.