Maratha Reservation : ‘मराठा समाजात जन्म झाला हा माझा गुन्हा आहे काय’?, आरक्षणासाठी विजेच्या तारांना पकडून तरुणाचा टोकाचा निर्णय…


Maratha Reservation : राज्यात गेल्या महिन्याभरपासून अनेक तरुणांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचल आहे. अशातचं आता मराठा आरक्षणासाठी हिंगोली जिल्ह्यात आणखी एका तरुणाने आपलं जीवन संपवलं आहे.

या तरुणाने घरातील विजेच्या तारांना पकडून आत्महत्या केली आहे. तसेच, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. ज्यात, मराठा समाजात जन्म झाला हा माझा गुन्हा आहे काय?, असा त्याने उल्लेख केला आहे.

आदिनाथ राखोंडे (वय.२७) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, हिंगोली जिल्ह्यातील आजरसोंडा येथील २७ वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी विजेच्या ताराला स्पर्श करत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आदित्य राखोंडे असे युवकाचे नाव असून, तो उच्चशिक्षित होता. Maratha Reservation

मात्र, असे असतांना नोकरी मिळत नसल्याने तो चिंतेत होता. विशेष म्हणजे, मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आदित्यचा सहभाग होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. ज्यात, मराठा समाजात जन्म झाला हा माझा गुन्हा आहे काय?, असा त्याने उल्लेख केला आहे.

काय लिहले सुसाईड नोटमध्ये?

एक मराठा लाख मराठा…मी सतत बातम्या पाहत आहे व मला असे वाटत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. माझे उच्च शिक्षण होऊनसुद्धा मला नोकरी मिळत नाही. माझ्या समाजाला न्याय मिळत नाही. त्यामुळे माझा मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा झाला आहे का? मी हतबल होऊन आज रात्री माझे जीवन संपवत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!