Maratha Reservation : सरकारला आता तरी घाम फुटेल का? पुन्हा दोन तरुणांनी संपवल आयुष्य, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या तरुणाचीही मराठा आरक्षणासाठी आत्महत्या…


Maratha Reservation : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकारने तातडीने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी मराठा आंदोलकांकडून केली जात आहे. यासाठी अनेक ठिकाणी आंदोलने देखील केली जात आहेत.

मनोज जरांगे (यांच्या आमरण आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलकांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका, असं आवाहन करत आहेत. Maratha Reservation

तसेच आता मराठा आरक्षणासाठी आणखी दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगमनेर तालुक्यात एका तरूणाने गळफास घेतला. तर दुसरी घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. या दोन आत्महत्यांनी सर्वत्र खळबळ उडाली आहे.

संगमनेर तालूक्यात एका तरूणाने घराच्या मागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

सागर वाळे (वय२५) असं या तरूणाचे नाव आहे.

‘आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा’, आरक्षण नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं त्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहलं आहे.

तर दुसरी घटना छत्रपती संभाजीनगर येथील आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील पोखरी गावातील एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचे माहिती समोर येत आहे.

शुभम अशोक गाडेकर रा. कोलठान याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

पोखरी शिवारात मराठा आरक्षणासाठी झाडाला गळफास लावून २३ वर्षीय तरूणाने आत्महत्या केली आहे. शुभम हा एमपीएससीची तयारी करत होता त्याच्या पश्चात एक मोठा भाऊ आई-वडील हे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. Maratha Reservation

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!