Maratha Reservation : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, नवले पूल परिसरात जाळपोळ, वाहतूक ठप्प…


Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच पेटला आहे. मनोज जरांगे यांचं अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू असून त्याला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलने केली जात आहेत.

आज पुण्यातील नवले पुल परिसरात मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पुणे-बेंगळुरू महामार्गावर वाहतूक अडवल्याचा प्रकार समोर आला. आंदोलकांनी टायर जाळल्यामुळे बाह्यमार्गावरील बाह्यवळण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. Maratha Reservation

मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी नवले ब्रीज येथे घोषणाबाजी करत आंदोलन सुरू आहे. आंदोलनस्थळी वाहनांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच या ठिकाणी मराठा समाजाच्या तरूणांनी मोठ्या संख्यने गर्दी केली आहे.

दरम्यान आंदोलकांनी प्रचंड रहदारी असणारा हा रस्ता बंद केल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गाड्यांच्या लांब रांगच रांग लागल्या आहेत. यामध्ये शेकडो नागरीक अनेक तासांपासून अडकून पडले आहेत. या वाहतूक कोंडीत अनेक रुग्णवाहिका आणि मुलांच्या स्कूलबस देखील अडकल्याची माहिती मिळत आहे.

मराठा आरक्षणासाठी बाई वळण मार्गावर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलकांनी नवले पूल परिसरात टायर जाळल्यामुळे मुंबई आणि साताऱ्याकडे जाणारे वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी आंदोलकांना रस्ता मोकळा करण्यास सूचना दिल्या. त्यानंतर या परिसरातील वाहतूक सुरळीत झाली.

जवळपास पाच पाच किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या असून मोठी वाहतूक कोंडी महामार्गावर पाहावयास मिळत आहे. यावेळी पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आंदोलनकर्त्यांना आंदोलन महामार्गावरून बाजू घेण्याची विनंती करत आहेत, परंतु आंदोलक आक्रमक होऊन महामार्गावरच ठिय्या मांडला आहे. यामुळे पोलीस देखील हातबल झाल्याचे महामार्गावर दिसून आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!