Uddhav Thackeray : मोदी म्हणाले, शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? आता उद्धव ठाकरेंनी थेट उत्तरच दिलं…

Uddhav Thackeray : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लिमिटेड स्थलांतरीत श्रीवर्धन शाखेचा उद्घाटन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे म्हणाले आता जे राजकारण सुरु आहे विरोधक असेल तर त्याला संपव, सोबत असेल त्यालाही संपव असं चाललेलं आहे. तिकडे जे मी करण सुरु आहे, त्याच्या विरोधात समीकरण आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.काल पंतप्रधान महाराष्ट्रात शिर्डीत येऊन गेले.

सध्या आरक्षणाचा प्रश्न धुमसतोय त्याच्या बद्दल काहीतरी बोलतील, असं वाटलं होतं. मणिपूरच्या प्रश्नावरही ते काल काही बोलले नाहीत. नरेंद्र मोदी राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, काल त्यांनी केला नाही. त्यांच्या बाजूला काल कोण बसलं होतं, जनता हे जे काही चालू आहे ते बघत आहे, असे ठाकरे म्हणाले आहे.


शरद पवार कृषी मंत्री होते, शिवसेना आंदोलन करत होती. मनमोहन सिंग यांचं सरकार होतं. देशात पहिल्यांदा कर्जमाफी शरद पवार कृषीमंत्री असताना करण्यात आली होती, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहे.
शिवसेना आणि शेकापच्या यापूर्वी मारामाऱ्या झालेल्या आहेत. पण, एवढी वर्ष गेल्यानंतर आम्ही एकत्र आलो कारण तेव्हा जे असायचं त्यात व्यक्तिगत विरोध नसायचा, सुडाचं राजकारण नसायचं, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे.
शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री जगजाहीर आहे. बाळासाहेब ठाकरे आणि बी. आर. अंतुले यांची देखील मैत्री होती, काही मुद्यांवर मतभेद असायचे पण वैयक्तिक पातळीवर शत्रूत्व नसायचं, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहे.