Maratha Reservation : धक्कादायक! माझं बलिदान वाया जाऊ देऊ नका, म्हणत तरुणाची मराठा आरक्षणासाठी आत्महत्या…

Maratha Reservation नांदेड : राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले असताना आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेडमधील हदगाव तालुक्यात हा प्रकार घडला आहे. Maratha Reservation
मराठा समाजाला आरक्षण भेटण्यासाठी मी माझ्या जीवाचे बलिदान देत आहे. माझे हे बलिदान वाया जाऊ नये. ‘एक मराठा लाख मराठा..’ अशी भावनिक चिठ्ठी लिहून एका २४ वर्षीय तरुणाने विष पिऊन आत्महत्या केली आहे.
शुभम सदाशिव पवार ( रा.वडगाव. ता हदगाव) असं तरुणाचं नाव आहे.
शनिवारी (ता.२१ )रात्री ८ वाजेच्या सुमारास अर्धापूर हद्दीत ही घटना उघडकीस आली आहे. तामसा रोडवरील एका मंगल कार्यालय परिसरातील झाडीत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शुभमजवळ एक चिठ्ठी सापडली. यामध्ये म्हटले आहे की, ‘एक मराठा लाख मराठा मराठा’ आरक्षण भेटण्यासाठी मी माझ्या जिवाचे बलिदान देत आहे. माझे हे बलिदान वाया जाऊ नये. मी शुभम सदाशिव पवार, असे चिठ्ठीत लिहले होते.
दरम्यान, अर्धापुर पोलीसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी विष्णुपुरी येथील सरकारी दवाखाना येथे दाखल केला. काही दिवसांपूर्वी हिमायतनगर तालुक्यातील कामारी गावातील एका उपोषणकर्त्या युवकाने आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेट देखील दिला आहे. मात्र दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातील लोकांच्या आत्महत्या सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.