Baramati News : मोठी बातमी! बारामतीमध्ये विमान कोसळले, टेकऑफ नंतर झाली तांत्रिक बिघाड..

Baramati News बारामती : बारामती तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बारामतीत विमान प्रशिक्षण संस्थेचे शिकाऊ विमान कोसळले आहे. ही घटना तालुक्यातील कटफळ रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर घडली आहे. Baramati News
या विमानाने बारामतीतील विमानतळावरून टेकऑफ घेतले होते.बारामतीतील विमानतळावरून टेकऑफ घेतल्यानंतर हे विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. Baramati News
ते नक्की कशामुळे कोसळले, त्याची मात्र माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेमुळे बारामती तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान गेल्या काही वर्षांपासून बारामतीत विमान प्रशिक्षण संस्था त्यांचे प्रशिक्षण कार्यालय चालवत आहेत. बारामतीतील विमानतळाचा त्यासाठी वापर होतो. काही महिन्यांपूर्वीच इंदापूर तालुक्यातील एक शिकाऊ विमान कोसळले होते.
यावेळी विमानाचे नुकसान झाले होते, मात्र त्यातील महिला पायलट प्रशिक्षणार्थी बचावली होती. ती घटना ताजी असतानाच आता दुसऱ्या एका प्रशिक्षण संस्थेचे विमान कोसळले आहे.