Lalit Patil Drugs Case : ललित पाटीलचा मोठा गौप्यस्फोट! म्हणाला, मी पळालो नाही मला पळवलं, पळवण्यात कोणाचा हात?

Lalit Patil Drugs Case पुणे : ससून रुग्णालयातून गेल्या १५ दिवसांपासून फरार असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला रात्री चेन्नई येथून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले. यावेळी मीडियाच्या कॅमेरॅसमोर बोलताना मी ससून रुग्णालयातून पळून गेलो नाही तर मला पळवण्यात आलं, असा खळबळजनक आरोप त्यानं केला आहे. Lalit Patil Drugs Case
मिळालेल्या माहिती नुसार, काहीवेळापूर्वीच ललित पाटील याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले असून त्यानंतर ललित पाटील याला अंधेरी न्यायालयात हजर केले जाईल. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ललित पाटील हे नाव प्रचंड चर्चेत आहे. त्यामुळे आज ललित पाटील नेमका आहे तरी कोण, हे पाहण्यासाठी मुंबई पोलिसांच्या कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमांची एकच गर्दी झाली होती.
पोलीस ललित याला रुग्णालयात नेत असताना तो पहिल्यांदाच सगळ्यांना दिसला. त्याच्या चेहऱ्यावर पोलिसांनी काळ्या रंगाचा कपडा घातला होता. हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने राज्यभरात या गुन्ह्याच्या तपासाची जोरदार चर्चा आहे. मात्र, या प्रकरणाचा सूत्रधार असलेला ललित पाटील याच्या देहबोलीत कोणताही तणाव जाणवत नव्हता. Lalit Patil Drugs Case
रुग्णालयात जाण्यासाठी गाडीत बसताना ललितने प्रथम, ‘मी पत्रकारांशी बोलीन’, असे त्याने सांगितले. यानंतर पोलिसांच्या गाडीने वेग पकडल्याने त्याला फार बोलता आले नाही.
यानंतर ललित पाटीलला रुग्णालयात आणल्यानंतर त्याने पुन्हा प्रसारमाध्यमांचे कॅमेरे दिसताच बोलायला सुरुवात केली. मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं आहे. यामध्ये कोणाकोणाचा हात आहे, हे मी सगळं सांगेन, असे ललित पाटीलने म्हटले.
त्यानंतर पोलिसांनी ललित पाटीलला लगेच रुग्णालयात नेले. मात्र, ललित पाटीलच्या या वक्तव्यामुळे नव्या वादामुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. ललित पाटील याला रुग्णालयातून पळवण्यात कोणाचा हात होता? त्याला राजकीय संरक्षण होते का? याबाबतच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.