Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललिता पाटील याला चेन्नईतून अटक! ड्रग्ज माफिया गिरीतील बड्या धेंड्याची नावे उजेडात येणार काय.!!


Lalit Patil ।मुंबई :  ससून रुग्णालयातून गेल्या १५ दिवसांपासून फरार असलेला  ड्रग्स माफिया ललित पाटील याला रात्री चेन्नई येथून  अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे . ससून रुग्णालयातून फरार झालेला ललित पाटील हा चेन्नई या ठिकाणी लपून बसला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दहा पथके तयार करण्यात आली होती. अखेर रात्री त्याचा शोध लागला असून त्याला अटक करण्यात आली आहे. (Lalit Patil arrested)

माहितीनुसार, ललित पाटील याला आता पुण्यामध्ये आणले जाणार आहे त्यानंतर त्याला कोर्टात हजर केल जाईल. ललित पाटील हा पोलिसांच्या हाती लागल्याने ड्रग्ज प्रकरणातील अनेक बड्या लोकांची नावे बाहेर येण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही. मागच्या पंधरा दिवसापासून ललित पाटील फरार होता मात्र अखेर तो चेन्नईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने चेन्नई गाठून ललित पाटील याच्या रात्रीच मुस्क्या आवळल्या.

दरम्यान, याप्रकरणी ड्रग्स माफीया ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याला देखील पोलिसांनी अटक केली होती. त्याचबरोबर त्याला तपासासाठी नाशिकला आणण्यात आले होते. नाशिकच्या उपनगर परिसरात असलेल्या भूषण पाटील याच्या घरी पुणे पोलिसांनी तपास केला. त्याच्या गावात जात पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई केली.

दरम्यान या तपासा प्रकरणी पुणे पोलिसचं नाही तर नाशिक पोलिसांकडून देखील कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. त्यामुळे लालची पाटील पोलिसांच्या हाती लागल्याचे बोलले जात आहे.lalit

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!