Sasoon Hospital Drug Racket : मोठी बातमी! ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, ड्रग्ज प्रकरणाचे तपास अधिकारीच..

Sasoon Hospital Drug Racket पुणे : ससून रुग्णालयात सुरु असलेले ड्रग्स तस्करी प्रकरण नुकतेच उघड झाले होते. या प्रकरणातील आरोपी ललित पाटील फरार झाल्यानंतर ससून रुग्णालय आणि पुणे पोलिसांवर चौफेर टीका होऊ लागली आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातील मोठी आणि महत्वाची माहिती समोर आली आहे. Sasoon Hospital Drug Racket

या प्रकरणाचे तपास अधिकारी बदलण्यात आले आहेत. ललित पाटील प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे करणार करणार आहे. याआधी हा तपास गुन्हे शाखेचे सुनील थोपटे करत होते. मात्र सुनील तांबे यांचा गंभीर गुन्ह्यांच्या तपासातील अनुभव लक्षात घेऊन तपास त्यांच्याकडे सोपवण्याचा पुणे पोलीस आयुक्तांनी निर्णय घेतला आहे. Sasoon Hospital Drug RacketSasoon Hospital Drug Racket
ड्रग माफिया ललित पाटीलचा भाऊ असलेला भुषण पाटील मेफेड्रॉन तयार करण्यात सहभागी होता. ससूनमधील ड्रग रॅकेट उघडकीस आल्यानंतर तो फरार झाला होता. पुणे पोलीसांनी त्याला उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेवरून अटक केली होती. नाशिकमध्ये ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील यांच्याशी संबंधित लोकांवर कारवाई केली जात आहे.

नाशिकमध्ये भूषण पाटील याचे सहकारी असलेले शिवाजी शिंदे आणि रोहितकुमार चौधरी या दोघांना अटक केली आहे. भूषण पाटील याचे मित्र आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. पुणे पोलिसांचे एक पथक सध्या नाशिकमध्ये कायमस्वरूपी तळ ठोकून आहे.

ड्रग माफिया ललित पाटील नेपाळमध्ये पळून गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मेफेड्रोन विक्रीच रॅकेट चालवत असल्यानं ललित पाटीलचे देशातील आणि देशाबाहेरील अनेक ड्रग्ज माफियांशी आधीपासूनच संबंध आहेत.
त्याचाच आधार घेऊन ललित पाटीलने नेपाळमध्ये आश्रय घेतला असण्याची शक्यता आहे. ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नेपाळ सीमेवर अटक केली मात्र ललित पाटील पुणे पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी ठरला आहे.