दौंड हत्याकांडात धक्कादायक माहिती आली समोर, हत्याकांडाचे परराज्यात कनेक्शन…!

दौंड : दौंड येथील सात जणांच्या मृत्यूने राज्यात खळबळ उडाली होती. येथे भिमा नदीपात्रात पारनेर तालुक्यातील सात जणांचे मृतदेह आणून टाकल्याची घटना घडली होती. यानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर आली होती. हे खून चुलतभावंडांनीच केल्याचे निष्पन्नही झाले.
दरम्यान याच्या तपासासाठी पोलिसांनी यंत्रणा उभी केली. यामध्ये एका अल्पवयीन मुलासह तब्बल सात जणांनी हे खून केल्याचे समोर आले होते. आता या खूनाच्या खटल्यासाठी पोलिस यंत्रणा राज्यातील विशेष सरकारी वकीलांची मदत घेणार आहे.
दौंड तालुक्यातील सामूहिक हत्याकांडाचा शास्त्रोक्त पध्दतीने तपास करण्यात आल्याचा दावा पुणे ग्रामीण पोलिसांनी केला आहे. तसेच
यातील वापरण्यात आलेले वाहन व हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
आरोपींनी खुनाची कबुली दिली असून आवश्यक ते नमुने फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने गोळा करण्यात आलेले आहेत. आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून एका आरोपीचा तपास परराज्यात केला जात आहे. त्यासाठी पथक पाठवले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी राहूल धस या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.