Crime News : सॅनिटरी पॅडमधून अंमली पदार्थांची तस्करी, तीन विदेशी महिलांना अटक…

Crime News मुंबई : अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोन महिलांनी चक्क त्यांच्या सॅनिटरी पॅड मधून कोकेन लपून आणल्याचा प्रकार मुंबई विमानतळावर उघडकीस आला आहे. तसेच तिसऱ्या प्रकणामध्ये एका महिलेने गुद्वारात अंमली पदार्थ लपवून आणले होते.

या तिनही महिलांना अटक केली आहे. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी या तस्करीचा पर्दाफाश केला असून या तस्करांच्या या नव्य पद्धतीमुळे अधिकारी देखील चक्रावले आहेत. Crime News
मिळालेल्या माहिती नुसार, युगांडा येथील दोन महिला अंमली पदार्थाची तस्करी करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. या महिला परदेशातून मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांच्या सामानाची तपासणी करण्यात आली.

त्यावेळी त्यांच्या सामानामध्ये काहीही आढळून आले नाही. परंतु, त्यांची सखोल तपासणी केली असता त्यांच्या सॅनिटरी पॅड मध्ये कोकेन असल्याचे आढळून आले. मुंबईत अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने मोठी कारवाई केली आहे.

दरम्यान, दुसऱ्या घटनेमध्ये टांझानिया देशातील महिला मुंबईत अंमली पदार्थाची तस्करी करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. तिची देखील सखोल तपासणी केली असता तिने गुद्वारामध्ये कोकेन लपवल्याचे आढळून आले.
मागील तीन दिवसांमध्ये डीआरआयने तस्करांकडून ५६८ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ५ कोटी ६८लाख रुपये एवढी आहे.